अनेक राजकीय नेते पोटात एक आणि ओठात एक अशा पद्धतीने वागतात. मात्र मराठा समाजाचे नेते विनायक मेटे हे खुलेआमपणे बोलायचे. कधीही त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असे कधीही समाजकारण आणि राजकारण करताना झाले नाही. मराठा समाजाचे प्रश्न ते अतिशय धाडसाने आणि अभ्यासपुर्णपणे सरकारकडे मांडायचे असेही आपल्या श्रध्दांजलीपर भाषणात औरंगाबादचे खा. इम्तियाज जलील यांनी म्हटले.