Friday, January 22, 2021
No menu items!
Home बीड हक्कासाठी कुंभार समाज एकवटला थापटणे मोर्चाने शहर दणाणले केंद्र सरकारविरुध्द प्रचंड रोष

हक्कासाठी कुंभार समाज एकवटला थापटणे मोर्चाने शहर दणाणले केंद्र सरकारविरुध्द प्रचंड रोष

, प्लास्टर ऑफ पॅरिस पासून मूर्त्या तयार करण्यासाठी घातलेली बंदी उठवावी,माती वाहतूक व वीट भट्टी परवान्यांच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा
बीड (रिपोर्टर):-
बारा बलुतेदारांसाठी रोहिणी आयोगाने स्वतंत्र नऊ टक्के आरक्षण द्यावे अशी शिफारस केलेली आहे ही प्रलंबित मागणी केंद्राने पूर्ण करावी, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून मूर्त्या तयार करण्यासाठी घातलेली बंदी तात्काळ उठविण्यात ावी ासह कुंभार समाजाची प्रगती होण्यासाठी समाजाच्या प्रलंबित मागण्या केंद्र सरकारने ततकळ मान्य कराव्यात यासाठी आज कुंभार समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चातून केंद्र सरकारविरुध्द प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. हा मोर्चा सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स बीड ेथून जिल्हाधिकारी र्काालयावर धडकला यावेळी बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कुंभार बांधव हसभागी झाले होते.


राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या कुंभार समाजावर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही अन्याय झालेला आहे. कुंभार समाजाची प्रगती होण्यासाठी समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य होणे आवश्यक आहे. मात्र राज्य आणि केंद्र शासन सातत्याने कुंभार समाजाचा आर्थिक दृष्ट्या कमकुवत बनविणारी धोरण अवलंबित आहे. त्यामुळे कुंभार समाजाची प्रगती होण्यापेक्षा अधोगतीच जास्त होऊ लागली आहे. कुंभार समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आणि राजकीय क्षेत्रात उन्नती होण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने कुंभार समाजाला न्याय देणे आवश्यक आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून मूर्त्या तयार करण्यासाठी घातलेली बंदी तात्काळ उठविण्यात ावी, बारा बलुतेदारांसाठी रोहिणी आोगाने स्वतंत्र नऊ टक्के आरक्षण द्यावे अशी शिफारस केलेली आहे ही प्रलंबित मागणी केंद्राने पूर्ण करावी, संत गोरोबाकाका ांचे जन्मस्थान तेरढोकी जिल्हा उस्मानाबाद ा तीर्थक्षेत्राला ‘अ’ दर्जा द्यावा, माती वाहतूक व वीट भट्टी परवान्यांच्या जाचक अटी रद्द करण्यात ावत, कुंभार समाजात ओळखपत्रावर परवाना मिळावा, कुंभार समाजातील 60 वर्षा पेक्षा ज्येष्ठ कारागिरांना शासनाकडून मानधन मिळावे आदी कुंभार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा थापटन मोर्चा आज कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र
या संघटनेच्या वतीने काढण्यात आला होता. यावेळी विविध संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिला. याावेळी अ‍ॅड, सुभाष राऊत बीड जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे, गेवराई तालुकाध्यक्ष रमेश जाधव, सरपंच राम जाधव, जालिंदर रेळेकर, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वाडेकर, ुवक जिल्हा अध्क्ष अनिल देवतरासे, सोशल मीडिया प्रमुख अशोक राऊत, जिल्हा संघटक मनोहर इटकर,, माजी जिल्हाध्यक्ष राम पोपळे, ज्येष्ठ मार्गदर्शक गौतम चित्रे, अ‍ॅड. शिवराज कुंभार, उत्तरेश्वर तडसकर, विठ्ठल गोरे, रावसाहेब देशमुख ांचसह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि कुभार समाज बांधव आणि बारा बलुतेदार मोठ्या संख्येने सहभागाी झाले होते.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

माजलगावमधील दोघांचे अंबाजोगाईत मृतदेह

एकाचा पाण्यात बुडून मृत्यू तर दुसर्‍याचा कोरड्या विहिरीत आढळला मृतदेहअंबाजोगाई (रिपोर्टर)- स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात असलेल्या तळ्याच्या पाण्यात बुडून ३८...