बीड (रिपोर्टर) मराठा समाजाला आरक्षण, सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, हा दिवंगत विनायक मेटे यांचा ध्यास होता. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अरबी समुद्रातील शिवस्मारक यासाठी स्व मेटे यांनी सतत प्रयत्न केले. मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी, त्यांच्या उन्नती, प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. मराठा समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, हीच दिवंगत विनायक मेटे यांना श्रद्धांजली अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत यांना श्रद्धांजली वाहिली.
ते विनायक मेटे यांच्या अंत्यविधीस्थळी श्रध्दांजली अर्पण करताना बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री विखे पाटील, तान्हाजी सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. श्रीकांत शिंदे, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, आ. भीमराव केराम, आ. संदीप क्षीरसागर, भारती लव्हेकर, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, आ. अभिमन्यू पवार, माजी मंत्री सदाभाऊ खोत, पाशा पटेल, नमिता मुंदडा, आ. श्वेता महाले, आ. सुमन आर. पाटील, आ. धनंजय मुंडे, खा. प्रतिम मुंडे, पंकजाताई मुंडेे, खा. जलील, आ. रत्नाकर गुट्टे, आ. बाळासाहेब आजबे, संजय दौड, अशोक पाटील, सुनिल धांडे, सुरेश नवले, राजेंद्र जगताप, जनार्धन तुपे, मात्री मंत्री खोतकर, सिराज देशमुख, माजी मंत्री, जयदत्त क्षीरसागर, पापा मोदी, आ. प्रकाश सोळंके, बदामराव पंडीत, औरंगाबाद विभागाचे पोलिस महानिरीक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक ठाकूर, उपविभागीय अधिकारी नामेदव टिळेकर, तहसीलदार सुहास हजारे, अधीक्षक कृषी अधिकारी जेजूरकर, कृषी अधिकारी साळवे, प्रा. मोराळे, अशोक हिंगे, अनिल जगताप, केशव आंधळे, कुडलकी खांडे, मुळकू, भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, फुलचंद कराड, टी. पी मुंडे, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, पप्पू कागदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले काळ सकाळी अपघाताचा माहिती मिळाली मी दवाखाण्याकडे निघालो पाठोपाठ निधनाची दुदैवी माहिती आली. मनाला चटका देणारी वेदना देणारी कालची घटना महाराष्ट्रात घडली. काही माणसे जी असता ती कुटुंबीयांपुरती मर्यादित नसतात. ती समाजासाठी उपेक्षीतांसाठी सातत्याने लढा देणारी असतात. मेटेंचा परिवार म्हणजे संर्पण
मराठा परिवार आहे. त्यांच्या अनेक वेळा माझ्या भेटी झाल्या त्यांनी कधी वयक्तीक काम माघितले नाही. मराठा समाजाला जे मिळायला पाहिजे त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यांचा एकच ध्यास होता. नव सरकार स्थापन झाल्यानंतर कुठल्यानही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्याव. उसतोड कामगारांचे प्रश्न सुटावेत. आरबी समुद्रात छत्रपती शिवाजीमहाराजांच स्मारक उभारव. आण्णाभाऊ साठे महामंडळातून मराठ्यांच्या पोराचे प्रश्न सुटावेत यावरच ते बालायचे. मेटेंसारखा दुर्मिळ माणूस शोधून सापडणार नाही. दुसर्यांचे दु:ख ते आपले दु:ख माणणारा आणि मराठा समाजासाठी रस्त्यावर न्यायालयात कायम संघर्ष करणारा नेता आपल्यातून गेला. निवायक मेटेंचा संघर्ष आम्ही वाया जावू देणार नाही. काही कराव लागल ते करु मेटे देह रुपाने तुमच्या आमच्यात नसले तरी त्यांचा संघर्ष त्यांचे कार्य आल्या सोबत आहे. त्यामुळे मेटेंचे बलिदान व्यर्थ जावू देणार नाही. त्यांनी हाती घेलेले सर्व काम मार्गी लावू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.