Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home कोरोना बीड जिल्ह्यात कोरोनाची लस साठवण्यासाठी 67 शीत साखळीगृह

बीड जिल्ह्यात कोरोनाची लस साठवण्यासाठी 67 शीत साखळीगृह


बीड (रिपोर्टर)- कोरोना विषाणू संसर्गावरील लसीला मान्यता मिळाल्यानंतर प्रशासन लसीकरणासाठी सज्ज झाले आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार असून त्या दृष्टीने साडेदहा हजार कर्मचार्‍यांची संकलित करण्यात आली आहे. प्रशासनाने लस साठवण्यासाठी 67 शीत साखळीगृह सज्ज ठेवले असून शहरासह ग्रामीण भागात दीडशे लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.\


बीड जिल्ह्यातील प्रशासनाने लसीकरणाची तयारी सुरू केली असून 10 हजार कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी सहाशे कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलिस त्यानंतर जेष्ठ नागरीक असा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय अशा सर्व प्रकारच्या एकूण 95 संस्थांमधील 10 हजार 517 कर्मचार्‍यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 604 पैकी 481 खासगी रुग्णालयांनी आपल्याकडील 5 हजार कर्मचार्‍यांची माहिती आरोग्य विभागाला दिली आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार, सीईओ अजित कुंभार यांनी लसीकरणाचा आढावा घेतला.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....