माणसाला माणूस म्हणून जगण्याची हिम्मत देणार्या महाराष्ट्रात सध्या तरुणांचे माथे भडकवण्याचे उद्योग सुरू आहेत. कधी धर्माच्या नावावर तर कधी देवांच्या नावावर समाध्यांपासून कबरींपर्यंत नतमस्तक होणार्या मस्तकात धर्मांधतेच्या, जातीयतेच्या अळ्या वळवळ करण्यास भाग पाडलं जातय. मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष कसं होईल, पोटापाण्याच्या प्रश्नाला बगल कशी दिली जाईल याकडे अधिक लक्ष देत आजचे तथाकथीत राजकारणी आणि धर्ममार्तंड हिंदू धर्माचा जयजयकार करण्याच्या नावावर जो काही धांगडधिंगा करू पाहत आहेत तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला, संस्काराला आणि अस्मितेला मारक असणारं आहे. राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना सर्रासपणे हरताळ फासली जात आहे. तरीही माणसातला माणूस जागं होण्याचं नाव घेत नाही. तेव्हा आपण नेमक्या कुठल्या दिशेने जातोय, हा भीतीदायक प्रश्न उपस्थित होतोच, कधी मस्जिदीसमोर हनुमान चालिसाचे राजकारण इथे केले जाते त्यातून मुस्लिमांचे मस्तके भडकले नाहीत, म्हणून की काय, हैद्राबादचा एक नवाब येतो आणि थेट औरंग्याच्या कबरीवर नतमस्तक होतो, इथं तरी हिंदूंचे मस्तके भडकतील, अशी अभिलाषा ठेवणार्या तथाकथीत धर्मांधांना आजपावेत तरी महाराष्ट्रातील जनतेने शांततेचे दर्शन घडवून जी चपराक लावली ती धर्मांध असलेल्या कोल्ह्या कुत्र्यांना थोबाडात हाणण्यासारखीच परंतु हे असच चालू राहिलं तर आपण पदरात विस्तव घेऊन फिरतोय. हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात यायला हवं. राजकारण्याच्यां जाहीर सभा होतात. आजच्या मूळ प्रश्नांना महत्व देण्यापेक्षा ज्यांचा वापर आजपर्यंत राजकारणासाठी करण्यात आला त्यांचा वापर आता थेट
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.