-
बीड (रिपोर्टर) छत्रपती संभाजी राजे यांनी आज लोकनेते स्वर्गीय विनायक मेटे यांच्या बीड येथिल निवासस्थानी भेट घेवुन मेटे कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी मराठा समाज आणि शिवसंग्राम पक्ष व संघटनेला बळ मिळण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी डॉ. ज्योती मेटे यांना आमदारकी द्यावी अशी मागणी संभाजी राजे यांनी केली. मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणार्या नेत्याच्या कुटुंबाला आणि संघटनेला बळ मिळाले पाहिजे. तसेच राजकीय पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रातल्या तमाम गरी मराठ्यांना न्याय मिळेल त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्राम चे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना राज्यपाल प्रणित किंवा इतर कोट्यातून आमदारकी द्यावे अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
मराठा आरक्षणाच्या बैठकीला जात असताना विनायकराव मेटे यांच्या गाडीला अपघात होवून त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले एक प्रकारे ते समाजाच्या प्रश्नांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि समाज प्रश्नांवर शहीद झाले अशी भावना आता समजा बांधावा मध्ये निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने मेटे कुटुंबीय सह शिवसंग्राम आणि मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळाला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळो या करिता आज छत्रपती संभाजी राजे यांनी मेटे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतील आणि भविष्यात आपल्याला कसलीही मदत लागली तर मी मेटे कुटुंबीया सोबत उभा असेल असे त्यांनी डॉ. ज्योती मेटे , रामहरी मेटे, मुलगा अशितोश मेटे यांना या वेळी सांगितले आणि त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना केली.
’तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील
शेतकर्यांना योजना दिल्या पाहिजे’
राज्यातल्या शेतकर्यांच्या प्रश्नावरुन संभाजीराजे यांना विचारला असता ते म्हणाले की, तेलंगणाच्या धर्तीवर शेतकर्यांना ज्या काही योजना मिळत आहेत तशाच योजना महाराष्ट्रातल्या शेतकर्यांना दिल्या पाहिजेत. अनेकदा आर्थिक विवंचनेतून नापिकी आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्या करतात तर त्यांना तेलंगणाच्या धर्तीवर ज्या योजना ते सरकार पुरवते त्याच योजना महाराष्ट्र सरकारने जर दिल्या तर महाराष्ट्रातल्या शेतकरी सुजलाम सुफलाम होतील.
…अन् बहिणीने टाहो फोडला
मेटे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती मेटे यांच्या घरामध्ये दाखल होताच त्यांच्या बहिणीने टाहो फोडला. माझ्या भावाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य खर्ची घातलं. त्याचा लढा आता तुम्ही पुढे चालू ठेवा, अशी भावनिक साद यावेळी त्यांनी संभाजीराजे छत्रपतींना घातली.