किल्लेधारूर (रिपोर्टर) कुपोषण संपुष्टात आणण्यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या. या अंगणवाड्याच्या माध्यमातून बालकांना सकस आहार पुरवला जातो. काही ठिकाणी निकृष्ट आहार दिला जात असल्याच्या तक्रारी असतात. गावंदरा येथील आहारात चक्क किडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी दोषीविरोधात कारवाई करावी अशी मागणी पालकांतून केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षापासून देशभरामध्ये अंगणवाड्या चालवल्या जातात. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाड्यांना आहाराचा पुरवठा केला जातो. झिरो ते सहा वयोगटातील सर्व बालक सनदा माता, गर्भवती मातांना आहाराचा पुरवठा करण्यात येत आहे. काही ठिकाणी आहाराच्या बाबतीत तक्रारी असतात. कर्मचारी व्यवस्थीत आहार बनवत नाहीत. आहार कशापध्दतीने बनवावा याचा रोजचा मेनु ठरवून देण्यात आला आहे. त्यानुसार आहार बनवला जात नाही. तालुका पातळीवर अंगणवाड्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम पंचायत समितीचे असते. मात्र अधिकारी उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करतात. धारूर तालुक्यातील गावंदरा येथे आहारामध्ये चक्क किडे आढळून आल्याने पालकात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी दोषीविरोधात कारवाई करावी अशी मागणी गावकर्यांच्या वतीने केली जात आहे. आज सकाळी अंगणवाडीमध्ये माझा मुलगा व मुलगी गेले होते. अंगणवाडी मधून घूगर्रा दिल्रा, त्रात छोटे छोटे किडे निघाले, या निकृष्ट आहारामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. असे पालक भिमराव दराडे यांनी म्हटले आहे.
किडे निघण्राचे प्रकार काही ठिकाणी झाले आहेत अशा ठिकाणी भेटी देऊन तपासणी केली आहे. राबाबत पुरवठा करणार्रा संबंधित कंपनीची तक्रार वरिष्ठांकडे करणार आहोत जी काही कारवाई करारची ते वरिष्ठ करतील रा संबंधितांच्रा तक्रारीची दखल आम्ही घेतली आहे.
-विलास कदम
महिला बालकल्राण प्रकल्प
अधिकारी पंचारत समिती धारूर