बीड रिपोर्टर
वक्फची मालमत्ता अनेकांनी नियमबाह्य पध्दतीने विक्री केलेली आहे. वक्फच भ्रष्टाचार प्रकरण राज्यात चांगलेच गाजलेले आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील काही जणांवर गुन्हे सुध्दा दाखल झालेले आहे. वक्फच्या मालमत्तेमध्ये वक्फ संस्थेच्या नावाची नोंद असणे आवश्यक आहे. तसे निर्देश मनुकुमार श्रीवास्तव प्रधान सचिव यांनी सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
प्रधान सचिवांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यातील वक्फ मालमत्ता यामध्ये मशिदी, दर्गा, कब्रस्तान, अनाथालय इत्यादी संस्थांची सलग्न वक्फ अधिनियम 1995 च्या कक्षेमध्ये येणार्या स्थावर मालमत्ता व मशरुतूल खिदमत इनाम अशा जमीनचा समावेश आहे. या संदर्भात गाव नुमना सातबाराच्या उतार्यावर यापुढे नोंद घेतांना भोगवटदार सदरी फक्त संबधीत वक्फ संस्थेचे नाव याची नोंद घेण्यात यावी. त्याशिवाय अन्य कोणाचीही नावाची नोंद असू नये. त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील वक्फ मालमत्तांच्या बाबतीत सातबारा उतार्याच्या इतर हक्क सदरी वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार अशि नोंद घेण्यात यावी नागरी भागातील वक्फ मिळकतीच्या बाबतीतही संबधीत वक्फ मालमत्तेच्या अधिकार अभिलेखामध्ये ( म्हणजेच प्रॉपर्टीकार्डमध्ये ) भोगवटदार सदरी संबधी वक्फ संस्थेचे नाव आणि इतर हक्क सदरी वक्फ प्रतिबंधीत सत्ता प्रकार अशि नोंद घेण्याकामी कायदयातील तरतुदीनूसार सतवर कार्यवाही करण्यात यावी सदरची कार्यवाही जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख यांनी करावी. सर्व जिल्हाधिकारी, क्षेत्रीय महसूल प्राधीकारी तसेच जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख यांनी या निर्देशाची तात्काळ अमलबजावणी करावी यासह आदि निर्देश प्रधान सचिवांनी दिलेले आहे.