बीड (रिपोर्टर) कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी केंद्र शासनाने लस उपलब्ध केली. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यात आला. ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही त्यातील अनेकांना डोस घेतल्याचा मॅसेज आला असून तशी नोंद वेबसाईटवर करण्यात आली आहे. सदरील हा प्रकार आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे होऊ लागला असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाने किती जणांनी चुकीची नोंद केली याची चौकशी जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी करायला हवी.
कोरोनाचा संसर्ग डोसमुळे कमी झाला. पहिला आणि दुसरा डोस घेणार्यांची संख्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही अशा अनेकांची डोस घेतल्याची नोंद आरोग्य विभागाकडे असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले. लसीकरणाची जबाबदारी पिरझाडे यांच्यावर आहे. स्टेडीयम परिसरातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्रात चक्क मोमीनपुरा या ठिकाणी दाखवले जात आहे. लसीकरण न होता त्याची नोंद वेबसाईटवर (पान 7 वर)
झाली कशी? असा प्रश्न उपस्तित होऊ लागला आहे. अशा चुकीच्या नोंदी आरोग्य प्रशासनाने किती जणांच्या केल्या याची चौकशी जिल्हा प्रशासनाने करायला हवी.
हे चुकीचं आहे, असं व्हायला नको -डॉ.गिते
डोस घेतल्याची चुकीची नोंद वेबसाईटवर झाली याबाबतची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांच्याकडे विचारली असता त्यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त करत असं व्हायला नको, हे चुकीचं असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.