बीड (रिपोर्टर):- आरोग्य विभागाला आज केवळ ४१२ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये तब्बल ३५ जण बाधीत आढळून आले आहे. यामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह हे बीड तालुक्यातील आहेत.
काल बीड जिल्ह्यात केवळ १७ जण बाधित आढळून आल्यानंतर आज दुपारी आरोग्य विभागाला ४१२ अहवाल प्राप्त झाले आहे. यामध्ये ३७७ जण निगेटीव्ह तर ३५ जण बाधित आढळून आले आहेत. बीड १७, अंबाजोगाई १०, परळी, माजलगाव, केज प्रत्येकी २, तर धारूर आणि आष्टीमध्ये प्रत्येकी १ रूग्ण आढळून आला आहे.