बीड (रिपोर्टर) बीड बायपासवर इनेव्हा गाडीने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. जखमीला सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल केले.
चंदू काळे (रा. भूम) हे आपली दुचाकी (क्र. एम.एच. 14 ए.एल. 8468) या गाडीने बीड बायपासने जात असताना समोरून आलेल्या एका इनेव्हा गाडी चालकाने त्याला भरधाव वेगात जोराची धडक देऊन पळ काढला. अपघातात जखमी झालेले काळे हे रस्त्यावर मदतीसाठी याचना करत होते. या वेळी तेथून जाणारे सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर बाळासाहेब कदम यांनी महामार्ग अॅम्ब्युलन्सला याची माहिती दिली. अॅम्ब्युलन्स काही मिनिटितच घटनास्थळी दाखल होत जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे काळे यांना वेळेवर उपचार मिळाले.
कार-दुचाकीचा भीषण अपघात दोघेजण गंभीर जखमी
मस्साजोग (रिपोर्टर) केज तालुक्यातील कोरेगाव पाटी जवळ दिनांक 28ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी साडेनऊच्या सुमारास ट्युव्हिलर आणि चार चाकी वाहणाचा भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे
केज ते मांजरसुंबा महामार्गा लगत असलेल्या कोरेगाव पाटी जवळ चार चाकी वाहण क्रमांक एम एच 12डि. वाय 3594 आणि ट्युव्हिलर क्रमांक एम एच 30एम 7682 या दोन वाहणाची धडक होऊन भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे . अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही अपघातात गंभीर जखमी झालेल्या रूग्णांना उपचार घेण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.