बीड (रिपोर्टर) कालच बीड आणि माजलगावात दोन ठिकाणी धाडी टाकून 13 लाखांचा गुटखा जप्त केला होता. आज पुन्हा माजलगावात सोळा पोते गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या पथकाने दुपारी दीड वाजता परभणी फाट्यावर केली.
जिल्ह्यात गुटख्याचा महापूर आला असून रोज कुठे ना कुठे गुटखा आढळून येतो. एसपींच्या पथकाने गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात धाडी टाकून लाखोंचा गुटखा जप्त केला आहे. काल पेठ बीड भागात नऊ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता तर माजलगाव ग्रामीण पोलिसांनीही तीन साडेतीन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. आज सकाळी नऊ वाजता शहरात एका पिकअपमधून गुटखा येत असल्याची माहिती एसपींच्या पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी पिकअपचा पाठलाग करून विना क्रमांकाचा पिकअप ताब्यात घेतला. त्यात 16 पोते गुटखा मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी अशोक सक्राते नामक गुटखा माफियाला ताब्यात घेतले. ही कारवाई एसपी ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकप्रमुख स.पोनि. विलास हजारे, पो.ना. शिवदास घोलप, किशोर गोरे, विनायक कडू, बालाजी बास्तेवाड, गणपत पवार यांच्यासह आदींनी केली.