बीड (रिपोर्टर) सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या राज्यातील सत्ता संघर्षावरील प्रकरणात अद्याप निकाल न आल्याने राजकीय पेच कायम असताना आणि प्रकरण पाच सदस्यीय खंडपीठासमोर आलेले असताना बंडखोर शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी जाहीर सभेत छातीठोकपणे 5 वर्षे या प्रकरणाचा निकाल लागणार नाही. धनुष्यबाण आपलाच असेल, 2024 ची निवडणूक धनुष्यबाणावर आपणच जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ, असा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने केेंद्रातील भाजप सरकार स्वहितासाठी वापरत असल्याची जाहीर चर्चा देशभरात होत असताना आता न्यायालयाचे निर्णयही भाजपाला हवे तसे घेता येतील. यापद्धतीचा हा दावा असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा ईडी यांच्या कारवायांवरून आधीच बदनाम झालेल्या भाजपा आता न्यायव्यवस्थेतही हस्तक्षेप करू पाहतय का? शिवसेना बंडखोर आमदार भरत गोगावलेंच्या या वक्तव्यावरून दिसून येत आहे. भाजपाच्या बाहेर असलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांवर आधी आरोप होतात आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले की, स्वच्छ होतात. असे अनेक उदाहरणे समोर असताना महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत भरत गोगावले यांनी केलेले जाहीर वक्तव्य दखलपात्र मानण्यात येत असून भरत गोगावले यांनी रत्नागीरीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत असं ते म्हणालेत. धनुष्यबाण आमचाच आहे, 7 तारखेला आम्ही तुम्हाला दाखवतो. या लोकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. अपात्र होतील सरकार कोसळेल याची वाट पाह होतो. पण मी आज सांगतो, घटनापीठाकडे गेलेल्या तक्रारीवर चार ते पाच वर्ष निकाल येणार नाही. यानंतर 2024 ची निवडणूक आपण जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ, असं भरत गोगावले म्हणाले आहेत.
आम्ही 40 आमदार, अपक्ष आणि 12 खासदार बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्याचं, वाढवण्याचं, हिंदुत्व पुढे नेण्याचं काम करतोय, त्यामुळे आम्ही गद्दार होऊ शकत नाहीत. थोरे म्हणाले की, जी काही शिल्लक शिवसेना आहे, त्यांनी त्यांचं बघाव, बाळासाहेबांची खऱी शिवसेना आम्ही आहोत. 1966 ला स्थापन झालेल्या या पक्षाचा आता वटवृक्ष झाला आहे. हा वटवृक्ष सुकायला लागला की काय असं वाटलं तेव्हा आम्ही उठाव केला, म्हणून आमचा नाद करायचा नाही सांगितलं. आम्ही त्या मिटरकरीला तुझी पिटकरी करून टाकेन सांगितलं. 7 तारखेला धनुष्यबाण निशाणी आम्ही घेऊ असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात उलटसुलट चर्चांना उधान आले असून भरत गोगावले यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला.