परळीतील नाथ प्रतिष्ठाण आयोजीत गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात रात्री अजय-अतुल या जोडगोळीचा संगीतमय कार्यक्रम झाला. या वेळी धनंजय मुंडे यांनी टीकाकारांचा खरपूस समाचार घेताना नाथ प्रतिष्ठाणने गेल्या 17 वर्षांच्या कालखंडात काय कामं केली, कोरोना कार्यकाळामध्ये कसे काम केले, हे सांगत ‘हम मे नाम है इसलिए हमे बदनाम कर रहे हो ’ असा टोला लगावून विविध लोककला, लावणी, सांस्कृतिक कार्यक्रम ही महाराष्ट्राच्या मातीची परंपरा आहे. अशा प्रामाणिक कार्यक्रमांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असल्याचे सांगत सांस्कृतिक कार्यक्रमांवरून विविध सामाजिक कार्यात व संकट काळात सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणार्या नाथ प्रतिष्ठार या संस्थेला बदनाम करण्यापेक्षा तुमचा राग माझ्यावर असेल तर व्यक्तीगत माझ्यावर टीका करा, असे धनंजय मुंडे म्हणाले. नाथ प्रतिष्ठाणच्या गणेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून याच दरम्यान प्रतिष्ठाणने आजपर्यंत राबवलेल्या विविध उपक्रमांची आठवण करून देत मुंडेंनी टीकाकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.