कंकालेश्वर परिसरातील विसर्जनाच्या विहिरीची केली पाहणी
पोलीस अधिक्षकांसह, सीईओ, तहसीलदारांची उपस्थिती
बीड (रिपोर्टर) गणेश विसर्जन शुक्रवारी होणार असल्याने बीड शहरातील विसर्जनाच्या मार्गाची पाहणी आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी भर पावसात पाहणी केली. शहरातील ज्या ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत ते खड्डे तात्काळ बुझवण्याच्या न.प. सीओंना दिल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी विजेचा प्रश्न आहे तो प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश विज वितरण कंपनीला देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधिक्षक ठाकूर, सीईओ पवार यांच्यासह डीवायएसपी, तहसीलदार, सर्व ठाणे प्रमुखांची उपस्थिती होती.
सध्या गणेश महोत्सव सुरू आहे. शुक्रवारी गणेशाचं विसर्जन होणार असून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जन केले जाते. पेठ बीड भागातील कंकालेश्वर मंदिर परिसरातील विहिरीमध्ये अनेक गणेश मंडळांच्या वतीने गणेशाचे विसर्जन केले जाते. या मार्गाची आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी पाहणी केली. रस्त्यावरील खड्ड्यांबाबतही सीओंना काही सूचना देण्यात आल्या. स्वच्छता करण्याचे आदेश नगरपालिकेला दिले. ज्या ठिकाणी विजेचा प्रश्न आहे तो प्रश्न तात्काळ सोडवण्याचे विज वितरण कंपनीला निर्देशित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधिक्षक ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, डीवायएसपी, शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रमुख, तहसीलदार हजारे यांची उपस्थिती होती. इतर गणेश मंडळ आपआपल्या सोयीनुसार गणेशाचे विसर्ज करत असतात.