अतिवृष्टीमुळे काही ठिकाणचा कापूस खराब
बीड (रिपोर्टर) तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर सप्टेंबर महिन्यात पाऊस पून्हा सक्रिय झाला. गेल्या तीन चार दिवसापासून जिल्हाभरात पाऊस पडू लागला. रात्री बीड तालुक्यासह जिल्हाभरात पावसाने धो धो हजेरी लावली. या पावसामुळे सिंदफणा,करपरा यासह आदि नद्यांना पाणी आले होते.बिंदुसरा धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. म्हाळसजवळा येथे विज पडून एक बैल ठार झाला. काही ठिकाणी अतिरिक्त पाऊस पडल्याने कापसासह इतर पिकाचे नुकसान झाले आहे. पाऊस चांगला पडल्याने शेतकरी मात्र समाधानी दिसून येत आहे.
ऑगस्टमध्ये पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पिकांना ताण बसला होता. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस पून्हा सक्रिय झाला. जिल्हाभरात दररोज कोठे ना कोठे पाऊस पडत आहे. रात्री धो धो पाऊस पडला. सकाळी 6 वाजेपर्यंत पाऊस पडत होता. रात्रीच्या पावसात म्हाळसजवळा येथे विज पडल्याने अशोक राम कदम या शेतकर्याचा बैल ठार झाला. यात सदरील शेतकर्याचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे सिंदफणा, करपरा यासह इतर नद्यांना पाणी आले होते. बीड शहराला पाणीपुरवठा करणार्या बिंदुसरा धरणाच्या पातणीपातळीत वाढ झाली. काहीठिकाणी अतिरिक्त पावसामुळे कापसासह इतर पिकाचे नुकसान होवू लागले. पाऊस जोरदार झाल्याने शेतकर्यामध्ये मात्र समाधान व्यक्त केले जात आहे. रात्रीच्या पावसामुळे तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली.
एका दिवसात 67 मि.मी. पावसाची जिल्ह्यात नोंद
तब्बल पंधरा ते वीस दिवसांची उघडीप दिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून बीड जिल्ह्यात पाऊस पडत आहे. काल मात्र बीड जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दमदार पाऊस पडला असून एकाच दिवसात 67 मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे रब्बीसाठी होणार्या पेरणीलाही मदत होणार आहे. बीड तालुक्यात 61.6 मि.मी., पाटोदा 88.5, आष्टी 67.1, गेवराई 106.0, माजलगाव 89.4, अंबाजोगाई 104.7, केज 58.7, परळी 103.6 धारूर 50.0, वडवणी 143.6, शिरूर कासार 143 मि.मी. अशा प्रकारे बीड जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली आहे.