Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीड‘हिंदु जगण्याची समृध्द अडगळ’या कादंबरीत बंजारा समाजाच्या महिलाविषयी आक्षेपार्ह लिखान

‘हिंदु जगण्याची समृध्द अडगळ’या कादंबरीत बंजारा समाजाच्या महिलाविषयी आक्षेपार्ह लिखान

लेखक भालचंद्र नेमाडे यांचा न्यानपीठ पुरस्कार परत घ्या-राष्ट्रीय बंजारा परिषद

बीड (रिपोर्टर) लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची समृध्द अडगळ या कादंबरीत लभान-बंजारा समाजातील स्त्रियाबद्दल आक्षेपार्ह लिखान करण्यात आले. हे लिखान जाणिवपूर्वक करण्यात आले असून याप्रकरणी नेमाडे यांचा न्यानपीठ पुरस्कार परत घेवून कादंबरीच्या विक्रीवर बंदी आणावी. अशी मागणी राष्ट्रीय बंजारा समाजाच्यावतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदु जगण्याची समृध्द अडगळ या कादंबरीमध्ये बंजारा समाजाच्या महिलाविषयी आक्षेपार्ह लिखान करण्यात आले असून त्यामुळे बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आक्षेपार्ह लिखान जाणीवपूर्वक करण्यात आले असून हा प्रकार निंदनीय आहे. ही कादंबरी भटकळ पॉप्युलर प्रकाशकाने प्रकाशित केली आहे. कादंबरीच्या पहिल्या खंडाला न्यानपीठ पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार निवड समितीला या कादंबरीतून विशिष्ट समाजाबद्दल व त्या समाजातील स्त्रियाबद्दल लेखकाने दुषीत भावनेतून लिखान केल्याचे कसे दिसले नाही? कादंबरीतून समस्त बंजारा समाजाच्या स्त्रियाबद्दल चुकीचे लिखान करून या अपमानीत करण्यात आले आहे. दरम्यान नेमाडे यांचा न्यानपीठ पुरस्कार परत घेवून कठोर कारवाई करण्यात यावी व कादंबरीवर बंदी आणावी अशी मागणी राष्ट्रीय बंजारा समाजाच्यावतीने प्रा.पी.टी.चव्हाण, कृष्णा राठोड, संजय चव्हाण, बाबुराव राठोड, राजाभाऊ चव्हाण, पवन जाधव सह आदिंनी केली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!