मुंबई (रिपोर्टर) याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीसाठी टायगर मेमनच्यानावाची धमकी देणार्या रऊफ मेमनसोबतच्या बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत आलेल्या किशोरी पेडणेकरांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेमन आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांचा एक फोटो ट्वीट केला आहे. आरोप करणार्या भाजपच्या बारा तोंडांनी या फोटोला कॅप्शन द्यावे खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसने रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो ट्वीट केला आहे.