Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईमअवैध वाळुचा ट्रक पकडला

अवैध वाळुचा ट्रक पकडला


बीड (रिपोर्टर)- सीना नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला असून चालकाविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सीना नदी पात्रातून अवैध वाळुचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर रात्री त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या वेळी त्यांना एम.एच. १२ सी.एच. १७११ क्रमांकाची ट्रक वाळुसह मिळून आली. या वेळी त्यांनी ट्रक आणि चालक अमोल रामदास आर्सुळ, (रा. तिखी ता. कर्जत) याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पी.आय. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय गोस्वामी, पो.ना. प्रसाद कदम, अशोक दुबाले, राहूल शिंदे, चालक गर्जे यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!