राजपिंप्रीत घडली घटना
गेवराई (रिपोर्टर) कर्जबाजारी असलेल्या एका 40 वर्षीय शेतकर्याने झाडावर चढून त्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील राजपिंप्री येथे घडली. या शेतकर्याकडे सोसायटीचे कर्ज असल्याचे सांगण्यात येते.
बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठया प्रमाणात आहे. गेवराई तालुक्यातील गोरख रावसाहेब केदार (वय 40, रा. राजपिंप्री) या शेतकर्याकडे कर्ज होते. या कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने शिवरीच्या झाडावर चढून त्यावरून उडी मारली होती. यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.