बीड (रिपोर्टर) संतोषीमाता चित्रमंदिराचे मालक वैभव क्षीरसागर यांच्या मातोश्री सौ.वनमाला सुरेश क्षीरसागर यांच्या पार्थिवदेहावर आज सकाळी 11 वा. नवगण राजुरी फाटा येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साश्रुनयनांनी त्यांचे ज्येष्ट पुत्र वैभव क्षीरसागर यांनी अग्नीडाग दिला. यावेळी वैभव क्षीरसागर यांचे राज्यभरातून आप्तस्वकिणयांंसह मित्र परिवार उपस्थित होता.
संतोषीमाता चित्रमंदिराचे मालक वैभव क्षीरसागर यांच्या मातोश्री वनमाला सुरेश क्षीरसागर या गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असताना काल सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. सौ.वनमाला क्षीरसागर या मृत्यूसमयी 73 वर्षाच्या होत्या. आज सकाळी त्यांच्या निवासस्थानापासून सौ.वनमाला क्षीरसागर यांची अंत्ययात्रा निघाली. नवगण राजुरी फाटा येथील क्षीरसागरांच्या शेतात त्यांच्या पार्थिवदेहावर सकाळी 11 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे ज्येष्ट पुत्र वैभव क्षीरसागर यांनी अग्नीडाग दिला. यावेळी डॉक्टर, वकिल, पत्रकार, आमदार, माजी आमदार, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, व्यावसायीक, व्यापारी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी सर्वसामान्य लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैभव क्षीरसागर यांचा राज्यभर मोठा मित्रपरिवार आहे. राज्यातल्या विविध भागातून या दु:खद प्रसंगी वैभव क्षीरसागर यांचे मित्र उपस्थित होते. क्षीरसागर कुटूंबियांवर कोसळलेल्या दु:खानंतर अनेकांनी वैभव क्षीरसागर यांचे सांत्वन केले.