नेकनूर (रिपोर्टर)ः- जनावरांना लंपी आजार होवू लागल्याने त्याचा प्रसार इतर ठिकाणी होवू नये यामुळे प्रशासनाने आठवडी बाजार बंद करण्याचे निर्णय घेतलेला आहे. नेकनूर येथील आठवडी बाजार आज बंद होता. हा बाजार मराठवाड्यामध्ये प्रसिध्द आहे. या बाजारात दर आठवड्याला लाखो रुपये उलाढाल होत असते. बाजार बंद असल्याने बाजारतळाचा परिसर ओस पडला होता.
आष्टी पाटोद्यासह इतर ठिकाणच्या जनांवरांना लंपी आजार झाल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून जनावरांचा आठवडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नेकनूरचा जनावरांचा आठवडी बाजार प्रसिध्द आहे. या बाजारात दर आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल होत असते. आज बाजार बंद असल्याने बाजार तळाचा परिसर ओस पडला होता.










