बीड (रिपोर्टर) आंबेडकरी चळवळ व धम्म कार्यात मोलाची कामगिरी करणारे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता बी.डी. साळवे यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय बौद्ध महासभेचा परिवार पोरका झाला आहे.
बी.डी. साळवे हे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता होते. ते भारतीय बौद्ध महासभेचे बीड जिल्हा संघटक होते. आंबेडकरी चळवळ आणि धम्म कार्यामध्ये त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांनी बामसेफ डी.एस.4 या कार्यक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. अतिशय कुशल प्रशासक संघटक व समाजसेवक अशी त्यांची ख्याती होती. दरवर्षी ते विद्यापीठात असलेल्या लेण्यामध्ये तेथील बौद्ध भिख्खुंना सहा महिने पुरेल एवढा अन्नसाठा देत असत. बीड शहर व परिसरातील विविध वंचित घटक, गरीब यांना ते सतत मदत करत असत. नुकतेच त्यांनी बिहारमधील बोधीगया येथील महाबोधी, महाविरामधील बौद्ध भिक्खुंना पाचशे ब्लँकेटचे वाटप केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने भारतीय बौद्ध समाज पोरका झाला. आज दुपारी एक वाजता त्यांच्या पार्थीवदेहावर बार्शी रोड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती. साळवे कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.