पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समज
बीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता. याची माहिती पेठबीड पोलिसांना मिळताच विवाह पार पडण्याच्या काही मिनिटेअगोदर पोलिसांनी तेथे पोहचून सदरील विवाह रोखला.
सोलापूर जिल्ह्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह बीड शहरातील एका २५ वर्षीय तरुणासोबत खडकपुरा येथील मंगल कार्यालयात मोठ्या धुमधडाक्यात लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. बालविवाह होत असल्याची माहिती पेठ बीड पोलिसांना मिळताच पोलिसांनी विवाहस्थळी जावून तो रोखला. यामध्ये वधू-वरांसह वरपित्याला पोलिस ठाण्यात आणून त्यांची समज काढली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विवाहस्थळी राज्य बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे, अशोक तांगडे यांनीही भेट देऊन वर-वधू पित्यांची समजूत काढली.