बीड (रिपोर्टर) राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागु करावी या प्रमुख मागणीसाठी आज ग्रामसेवक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये सर्व ग्रामसेवकांचा सहभाग होता. हातात फलक घेवून ग्रामसेवक रस्त्यावर उतरले होते. आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
राज्य शासनाच्या सेवेत तसेच जिल्हा परिषद अंतर्गत 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी. या प्रमुख मागणीसाठी आज ग्रामसेवक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदरील हा मोर्चा सिध्दीविनायक कॉम्पलेक्स या ठिकाणाहून निघाला होता. ग्रामसेवकांनी हातामध्ये फलक घेवून मोर्चात सहभाग घेतला. जुन्या पेन्शन योजनेसाठी यापूर्वी अनेकवेळा संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आलेले आहे. शासनाने या मागणीची दखल घ्यावी. यासाठी आज संघटनेने मोर्चा काढला होता. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.