जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा-शेख रमीज
बीड (रिपोर्टर): शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर सय्यद शाकेर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या शिबिरात जास्तीत जास्त रक्क्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन शेख रमीज यांनी केले आहे.
सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच कार्यरत असणार्या सय्यद शाकेर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या सकाळी मोमीनपुरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी १० ते ५ या दरम्यान रक्तदान शिबिर होत आहे. या शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्क्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान करावे असे आवाहन शेख रमीज यांनी केले आहे.