बीड (रिपोर्टर) पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून बळजबरीने वैश्याव्यवसाय करवून घेणार्या तीन आंटींसह एका एजंटाला पोलिसांनी अटक केली. शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीतील एकनाथनगरात 20 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता पोलिसांनी कुंटणखान्याचा पर्दाङ्गाश केला. यावेळी दोन पीडितांची सुटका करण्यात आली.
शहरातील एकनाथ नगरातील एका घरात कुंटणखाना सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक (गृह) प्रशांत शिंदे, पोलीस अधीक्षकांच्या पथकाचे प्रमुख व सहायक निरीक्षक विलास हजारे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख सुरेखा धस, सहायक उपनिरीक्षक प्रताप वाळके, हवालदार सुरेखा उगले, अंमलदार सतीश बहिरवाळ, विकास नेवडे, शिवदास घोलप, बालाजी बास्टेवाड, राम काकडे यांनी सापळा लावला. डमी ग्राहक पाठवला. त्याच्याकडून आंटीने दीड हजार रुपये घेतले. त्याने बाहेर येऊन इशारा करताच पोलिसांनी धाड टाकली. यावेळी दोन
पीडितांची सुटका केली तर तीन आंटींसह एजंट म्हणून काम करणार्या रिक्षाचालकास पकडले. एका आंटीच्याच घरात हा सगळा प्रकार सुरु होता, असे पोलिसांनी सांगितले. शोभा चंद्रकांत बीडकर, दीक्षा राजेश मिरपगार, रेखा विजय चव्हाण, रिक्षाचालक महेश मोहन चांदणे या चौघांविरुध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
रिक्षावाला करायचा राखण
दरम्यान, यातील एजंट असलेला रिक्षाचालक महेश चांदणे ग्राहकांची व पीडितांची ने-आण करत असे. शिवाय दारासमोर थांबून राखण करण्याचेही काम करायचा. या बदल्यात त्यास एका ग्राहकाने दोन ते तीनशे रुपये मिळायचे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.