Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडजालना जिल्ह्यातील राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाचे लोण आता गेवराई तालुक्यात

जालना जिल्ह्यातील राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाचे लोण आता गेवराई तालुक्यात


मराठा आरक्षण प्रश्नी साष्टपिंपळगाव येथील राज्यव्यापी ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मालेगाव खुर्द येथे आजपासून आंदोलनाला सुरुवात
गेवराई (रिपोर्टर) मराठा आरक्षण प्रश्नी जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे दि.२० जानेवारी रोजी सुरू असलेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाचे लोण आता गेवराई तालुक्यात पोहचले असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेवराई तालुक्यातील मालेगाव खुर्द येथे आजपासून ठिय्या आंदोलन सुरू झाले असून या आंदोलनाला मराठा समाज बांधवांसह इतर समाजाचाही भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान पहिल्याच दिवशी या आंदोलनाला कै. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आ.लक्ष्मण पवार, माजी आमदार राजेंद्र जगताप, रमेशभाऊ पोकळे, बीड मराठा क्रांती समन्वय समितीचे समन्वयक भगवानराव जाधव, अशोक हिंगे, सचिन मोटे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व ग्रामस्थ यांच्यासह परिसरातील मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मराठा आरक्षण प्रश्नी जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे दि.२० जानेवारी रोजी सुरू असलेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाची ठिणगी आता गेवराई तालुक्यात पोहचली असून मालेगाव येथे आजपासून हे आंदोलन सुरू झाले असून गावातील सर्व ग्रामस्थांनी महिला मुलांबाळासह या आंदोलनात ठिय्या मांडला असून जो पर्यंत या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे.

या आंदोलनाचे परिणाम सरकारला
भोगावे लागतील-नरेंद्र पाटील
मराठा आरक्षण प्रलंबित निर्णय प्रश्नी दि.२० जानेवारी पासून जालना जिल्ह्यातील सष्टपिंपळगाव येथुन सुरू झालेल्या ठिया आंदोलनाची ठिणगी राज्यभरात पसरणार असून या आंदोलनाचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा नरेंद्र पाटील यांनी या आंदोलनाला संबोधित करताना केली. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, भाजप सरकारच्या काळात मराठा क्रांती मोर्चाने सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले आणि समाजाला आरक्षण देण्यात आले. मात्र हे आरक्षण कोर्टात टिकू शकले नाही. यानंतर पुढील काळात चालू सरकार या आरक्षण प्रश्नावर उदासीन असल्याचे दिसून येत असून याबाबत कुठलाच निर्णय ना होता तारीख पे तारीख सुरू असून यासाठी पुन्हा एकदा आपल्याला लढा उभारावा लागेल आणि या लढ्याची सुरुवात ही या साष्टपिंपळगाव आणि मालेगाव ग्रामस्थांनी सुरू केली असून ही ठिणगी राज्यभरात पोहचणार असून हे आंदोलन पेटण्याच्या आत सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा लागेल नसता याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील.

तत्कालीन सरकारने मराठा आरक्षण प्रश्नी समाजाच्या भावना समजावून घेत या बाबत सभागृहात हा चर्चा करून समजला न्याय देण्यासाठी आरक्षण जाहीर केले होते मात्र हे आरक्षण कोर्टात गेल्यानंतर आताच्या सरकारने उदासीनता दाखवून पाठपुरावा न केल्यामुळे कोर्टात फेटाळले असून आता यासाठी पुन्हा लढा उभारावा लागेल यासाठी आम्ही सभागृहात आवाज उठवून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडू.
-आ.लक्ष्मण पवार

Most Popular

error: Content is protected !!