राजुशेखर मोरेंच्या पत्नीला माजलगावकरांनी दिली 47 लाखाची मदत
कोल्हापूर । दिनकर शिंदे
माजलगावकरांनी केलेली हि मदत अभूतपूर्व आणि लक्षवेधी आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या तरूणांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल. असा विश्वास व्यक्त करत प्रशासनाने राजुशेखर मोरे यांच्या कुटूंबियांना अनुकंपा धरतीवर तात्काळ सेवेत सामावून घ्या असे आदेश कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिले.
माजलगाव येथील तलावात एका डॉक्टर मृतदेह पाण्याबाहेर काढताना मृत्यूमुखी पडलेले अग्नीशमक दलाचे जवान राजुशेखर मोरे यांच्या कुटूंबियांना माजलगावकरांच्यावतीने 38 लाख 50 हजार रूपये व ऑनलाईन 8 लाख 50 हजार रूपये अशी मिळून एकूण 47 लाख रूपयांची मदत आज माजलगावच्या एका शिष्टमंडळाने थेट कोल्हापूरमध्ये जावून दिली. कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, मनपा आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, डॉ.प्रसाद शंकपाळ, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, तहसिलदार शितल मुळे, निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके हे उपस्थित होते. शिष्टमंडळामध्ये बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंह सोळंके, अॅड.बी.आर.डक, राहुल लंगडे, सुशिल सोळंके, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम येवले, उमेश मोगरेकर, हरिष यादव, सुभाष नाकलगावकर, कमलेश जाब्रस, दिनकर शिंदे, पांडूरंग उगले, आनंद डाके, रमेश गिरी, गणेश लोहिया, भांडेकर, सुशिल सोळंके, दिनेश मस्के, अजय पोपळे हे होते. यावेळी पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडलेले राजुशेखर मोरे यांच्या पत्नींना माजलगावमधून जमा करण्यात आलेली मदत देण्यात आली.