बीड (रिपोर्टर) पेन्शन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, सरकारला आमचं ऐकून घ्यावंच लागेल, अनुदान आमच्या हक्काचं यासह इतर घोषणा देत हजारो शिक्षक आज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल या ठिकाणाहून शिक्षकांचा मोर्चा निघाला होता. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जुन्या पेन्शनसह इतर मागण्या घेवून मराठवाडा शिक्षक संघ व इतर संघटनांनी आजचा मोर्चा काढला होता. मोर्चामध्ये जिल्हाभरातील माध्यमिक शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषकरून महिला शिक्षकांची मोर्चात लक्षनिय उपस्थिती दिसून आली. संघटनेच्या वतीने आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
राज्य सरकारने शासकीय कर्मचार्यांची जुनी पेन्शन योजना बंद केली. ही पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, त्यातच विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानित करण्यात यावे, शिक्षणातील वेटबिगारी संपवण्यात यावी, सर्व शिक्षकांना शंभर टक्के पगार द्यावा यासह इतर मागण्यासाठी आज मराठवाडा शिक्षक संघ व इतर संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलापासून निघाला होता. मोर्चामध्ये जिल्हाभरातील हजारो शिक्षकांचा सहभाग होता. विशेष करून महिला शिक्षक आजच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. घोषणाबाजी करत हातात फलक घेवून शिक्षक आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले होते. मोर्चाचं नेतृत्व संघटनेचे पीएस घाडगे, राजकुमार कदम, उत्तमराव सानप यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.