केज (रिपोर्टर)- बोअरवरील विद्युत मोटार सुरू करत असताना विजेचा शॉक लागल्याने एका ५५ वर्षीय शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली.
बनसारोळा येथील भीमराव दशरथ गोरे हे रात्री गव्हाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. बोअरची मोटर सुरू करत असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी यूसुफवडगावचे पोलिस आठवले, वाले, शेख, अहंकारे यांनी पंचनामा केला.
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.