केज (रिपोर्टर) बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्यातल्या अनेक गावांना पाणीपुरवठा करणार्या मांजरा धरणामध्ये 72 टक्के पाण्याचा साठा जमा झाला. उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून या धरणामध्ये आणखी पाण्याचा विसर्ग सुरुच आहे.
केज तालुक्यात सर्वाधिक मोठं असलेल्या मांजरा धरणामध्ये 72 टक्के पाण्याचा साठा जमा झाला. परवा झालेल्या धुव्वाधार पावसामुळे मांजरा नदीला चांगले पाणी आल्याने धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांना येथून पाणीपुरवठा केला जातो तसेच केज, धारूरसह बारा गावांना पाणीपुरवठा होत असल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला त्याचबरोबर परिसरातील शेतकर्यांना या धरणातून चांगला फायदा हाते असतो. उन्हाळ्यात धरणातून पिकांना पाणी देता येते. सलग तीन वर्षे हे धरण भरत आलेलं आहे.