1962 पासून या तालुक्याचा मी सालक्या आहे. थकलो तरी राखण करतो, पोरांनाही सांगितलय, नीट काम करा, नाहीतर तुमची खैर नाही. आपण लोकांसाठी काम करायचय, असं म्हणत शिवाजीरावांनी आता एकच शेवटची इच्छा व्यक्त केली. माझा लहाना विजयसिंह याला पदरात घ्या, म्हणत शिवाजीरावांनी तालुक्याचा आणि गेवराईचा विचार करत सोलापूर-जळगाव रेल्वे मार्गाकडे लक्ष केंद्रित करत रेल्वेमंत्री रावासाहेब दानवे यांना या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
गेल्या दहा वर्षांपासून मी सत्कार घेणं बंद केलं. परंतु मला माहिती न देता माझ्या लाडक्या कार्यकर्त्यांनी एक आयोजन समिती तयार करून थेट शरद पावर साहेबांना निरोप दिला त्यानंतर मला या सोहळ्या बद्दल माहिती देण्यात आली. परंतु या सोहळ्यासाठी पवार साहेब व ज्यांनी छत्रपतीच्या घराण्याला पराभूत केलं ते सातारचे नेतृत्व श्रीनिवास पाटील व आजी माजी मंत्री राजकीय नेते आले याचा आनंद वाटला.
आज या मान्यवरांच्या उपस्थितीत होत असलेला सोहळा माझ्यासाठी परमानंदाचा क्षण आहे. राजकीय क्षेत्रात काम करत असताना मी या जनतेचा सालकरी म्हणून काम केलं. जनतेनेही मला विविध पदासह राज्याच्या म मंत्रिमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी दिली हे जनतेचे उपकार मी कधीच विसरणार नाही. सामाजिक कामाची तळमळ होती म्हणून मी राजकारणात आलो आज माझे तिनही मुले जनतेच्या सेवेत आहेत याचा मनस्वी आनंद वाटतो. नेतृत्व करत असताना तालुक्यात शिक्षणाचे जाळे उभा करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे आज शिक्षण क्षेत्रात आपल्या तालुक्याचा नावलौकिक होत आहे. यापुढे तालुक्याचा विकास व्हावा असे वाटत असेल तर माझं अपूर्ण असलेलं स्वप्न विजय ला एकदा निवडून द्या अशी भावनिक साद त्यांनी उपस्थित जनतेला घातली.