तालुक्यात खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी प्रक्रिया करण्याची आजची शेवटची तारीख आहे. ई-पीक पाहणी मोबाइल शेतकर्यांना मोबाइल प-व्हर्जन-2 विकसित करण्यात आलेले आहे. हे सुधारित ई-पीक पाहणी मोबाइल प व्हर्जन-2 गुगल प्ले स्टोअरवरून शेतकर्यांनी डाऊनलोड करून मागिल 2 ते 3 दिवसांपासून सर्वर डाऊन असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी माहिती भरण्यासाठी काल दिवसभर व आज दि.15 ऑक्टोंबर रोजी पहाटे पासूनच प्रयत्न करत आहेत.परंतु डाउन सर्वर मुळे शेतकर्यांचा वेळ ही जात यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून शेतकर्यांना यापासून वंचित रहावे लागणार आहे.त्यामुळे (पान 7 वर)
किमान मुदत तरी वाढवून देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
शेतकर्यांनी ई पिक पाहणी व्हर्जन 2 हे प डाऊनलोड करून मोबाइलद्वारे आपल्या पिकाची नोंद करणे आवश्यक आहे. सर्व शेतकर्यांनी ई-पीक पाहणीचे प डाउनलोड करून मोबाइलद्वारे आपल्या पिकाची नोंद करावी. पमध्ये पिकाची नोंद करण्यासाठी 15 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे.परंतु मागिल 2 दिवसांपासून आज शेवटच्या दिवशी सकाळपासून च सर्वर डाऊन असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.शेतकर्यांना नोंद नाही झाली तर पिक पेरा यांपासून वंचित रहावे लागणार असल्याने वेळ वाढवून द्या अन्यथा सर्वर दुरुस्त करा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.