आर्थिक व्यवहार करून शिफ्टींग झाली का? चौकशीची गरज; अलर्ट झोनमध्ये डिपी बसवल्याची चर्चा
बीड (रिपोर्टर):- महावितरणच्या माध्यमातून झालेली अनेक कामे संशयाच्या भोवर्यात असून अनेक प्रकरणात फक्त चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. महावितरणच्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो का? किंवा लाभार्थ्यांसाठी आलेली योजना गरजुंपर्यंत पोहचती का? या सर्व बाबी चर्चेत आहेत. अनेक प्रकरणात महावितरणकडे तक्रारी आलेल्या असल्यातरी या संदर्भात आत्तापर्यंत कोणत्याही जिम्मेदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई झालेली दिसत नाही. त्याचाच परिणाम महावितरणच्या माध्यमातून होणारी कामे संशयाच्या भोवर्यात असून खांबाची लाईन व डिपी शिफ्टींगमध्ये झालेला गोंधळ संशयास्पद असून एकंदरीत महावितरणची लाईन व डिपी शिफ्टींग संशयाच्या भोवर्यात आहे. या शिफ्टींगसाठी आर्थिक व्यवहार झाला का? संबंधित अधिकारी यांच्या परवानगीने शिफ्टींग झाली का? नियमाने शिफ्टींग करण्यासाठी होणारा खर्च संबंधितांकडून भरून घेतला का? असे अनेक प्रश्न शिफ्टींग संदर्भात अनुत्तरीत असून आता तर चक्क अलर्ट झोनमध्येही डिपी बसवल्याची माहिती समोर येत आहे.
जर एखाद्या ग्राहकाच्या प्लॉटमध्ये किंवा शेतामध्ये महावितरणची विद्युत लाईन जात असेल किंवा डि.पी. बसलेली असेल ज्यातून संबंधिताला अडथळा निर्माण होत असेल अशी लाईन शिफ्टींग करण्यासाठी महावितरणमध्ये तरतूद आहे. नियमाने ज्या व्यक्तीला या लाईनचा किंवा डि.पी.चा त्रास होत असेल त्यांनी तक्रार देवून त्या कामावर होणारा शिफ्टींग खर्च भरावा आणि महावितरण कंपनीने दुसर्या चांगल्या जागेवर ही शिफ्टींग करावी. परंतू शहरात अनेक ठिकाणी डिपी शिफ्टींग, लाईन शिफ्टींग होतांना दिसत आहे. या शिफ्टींग संबंधी संबंधीत विभागाच्या अभियंत्याने वरिष्ठांना कळविले का? नियमाने संबंधितांकडून शिफ्टींग फीस भरून घेतली का? असे प्रश्न अनेकांना माहित नसतात. नियमाने शिफ्टींग विना परवानगी करत येत नाही. परंतू अनेक ठिकाणी लाईन व डि.पी.शिफ्ट झालेल्य आहेत. उदाहरणार्थ पोद्दार शाळेजवळील डिपी ज्याचे स्थलांतर झाले. त्यानंतर शांताई हॉटेलमागील लाईन फिडर जे की, बंद केल्यानंतर 1 फीडरच बंद झालेले आहे. तसेच कंकालेश्वर परिसरात बसलेली डिपी, ही डिपी अलर्ट झोनमध्ये बसवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सध्या बशीरगंज भागात सुरू असलेल्या एक्सप्रेस फीडर यावरचीही लाईन शिफ्ट करण्यात आली. वरील केलेल्या शिफ्टींगच्या कामात महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांना माहिती देण्यात आली का? संबंधितांकडून नियमाने फीस आकारली का? याची माहिती महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी घेणे गरजेचे असून शिफ्टींगच्या कामात अनेक कामे संशयाच्या भोवर्यात असल्याने या सर्व कामाची चौकशी करण्याची गरज आहे.