आष्टी (रिपोर्टर):- आष्टी तालुक्यात मागिल 8 दिवसांपासून ढगफुटी सदृश्य जोरदार पावसाने थैमान घातले होते.यात शेतमालासह नागरीकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथे शेतकर्यांच्या बांधावर चिखल तुडवत जाऊन शेतकर्यांशी भेटून चर्चा केली नुकसान झालेल्या भागातील पिकांची पाहणी करुन शेतकर्यांशी संवाद साधला. कुजलेले सोयाबीन पिक हातात घेऊन शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेत तुम्ही एकटे नाहीत शासन प्रशासन तुमच्या पाठीशी म्हणत नुकसान
ग्रस्त शेतकर्यांना धीर दिला यावेळी आ.बाळासाहेब आजबे,उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार विनोद गुंडमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,तलाठी, ग्रामसेवक,कृषी सहायक, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने पुरपरिस्थिती निर्माण झाली होती.धोधो पावसाने अनेक नद्या नाल्यांना पुर,पुल तुटले, वाहतूक ठप्प होती.काही गावांचा संपर्क तुटला शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले,जमिनी खरडून गेल्या उद्भवलेल्या स्थितीची जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रविवारी दि.16 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 च्या दरम्यान चिखलातून शेतकर्यांच्या बांधावर पोहचले व कांदा, कापूस, सोयाबीन,तुर,या पिकांची पाहणी केली.जिल्हाधिकारी म्हणाले शेतमालाचे नुकसान झाले आहे. पडलेली घरे, शेतीचे नुकसान, विविध विभागांचे नुकसान, मृत किंवा जखमी व्यक्ती, पायाभुत सुविधांमध्ये रस्ते, पूल, वीज पुरवठा नुकसानीची भरपाई करण्यासाठी तसेच पूरग्रस्त नागरिकांना मदत देण्यासंदर्भात तात्काळ पंचनामे करून अहवाल पाठवावे अशा सूचना कर्मचार्यांना दिल्या यावेळी आण्णासाहेब चौधरी, सरपंच सतिश धस,सरपंच राहुल काकडे, सरपंच बबन शेकडे,रामा झगडे, हनुमान झगडे,सरपंच राहुल जगताप, सरपंच अशोक पोकळे, संदिप पानसाडे, संतोष सानप,मारुती पवार,संदिप सानप,भिमराव सानप,राजेंद्र हराळ,विनोद झाबळे,सुरेश पवार,आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
पंचनामे न करता सरसकट हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्यावी जिल्हाधिकारी यांच्याकडे आ.बाळासाहेब आजबे यांची निवेदनाद्वारे मागणी
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात परतीच्या पावसाने मागील पंधरा दिवसापासून हाहाकार माजवला असून अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांचे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे रब्बीची पेरणी देखील शेतकर्यांना करता आली नाही शेतकर्यांचे न भरून येणारे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे तरी बागायती क्षेत्रासाठी सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये तर जिरायती क्षेत्रासाठी पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे आ.आजबे यांनी केली आहे.
पूरग्रस्तांशी संवाद
आष्टी तालुक्यातील सोलेवाडी येथील नदीच्या पुराच्या पाण्यात पुल वाहून गेला होता.व शेतकर्यांच्या पोल्ट्रीमध्ये पाणी शिरल्याने कोंबड्या मृत व वाहून गेल्या परतीच्या पावसाने शेतातील पिके उद्धवस्त झाली सोलेवाडी येथील शेतीची कोंबड्या वाहून गेलेल्या पोल्ट्री ची,व वाहून गेलेल्या पुलाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. शेतकर्यांच्या भेटी घेत जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या व्यथा जाणून, नुकसान ग्रस्तांना धीर देत अधिका-यांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश यावेळी दिले.