बीड (रिपोर्टर) लक्ष्मण नगर भागातील नागरिकांना नगरपालिकेने तात्काळ मावेजा द्यावा या मागणीसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही नागरिक उपोषणाला बसले आहेत.
नगर परिषद बीडने भूसंपादन करून तात्काळ मावेजा द्यावा, भूमिअभिलेख कार्यालयाने सर्वे नंबरमधील संभ्रम दूर करावा, बीड तहसील कार्यालयाने कुळ कायद्याची संचीका द्यावी यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्मण नगर भागातील डीपी. रोड धारक आमरण उपोषण करत आहेत.