Monday, March 8, 2021
No menu items!
Home कोरोना पुण्यात ११ ते ६ नाईट कर्फ्यू, २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये राहणार बंद

पुण्यात ११ ते ६ नाईट कर्फ्यू, २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये राहणार बंद


पुणे (रिपोर्टर)-पुणे शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, करोनामुळे पुणेकरांना पुन्हा काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पुण्यात रात्री ११ वाजेनंतर बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली असून, २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.
पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (२१ फेब्रवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली होती. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच लग्न समारंभासह राजकीय कार्यक्रम घेण्यासाठी अगोदर पोलिसांची परवनगी घ्यावी लागणार असून, २०० नागरिकांचं बंधन घालण्यात आलं आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


करोना बाधितांची रुग्णसंख्या सुरुवातीच्या काळात ४ टक्के होती. आता १० टक्क्‌यांवर गेली आहे. त्यामुळे विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये २८ फेब्रवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे अभ्यासिका वर्ग ५० टक्के क्षमतेने चालविण्यात यावेत. तसेच रात्री ११ पर्यंतच हॉटेल सुरू ठेवता येणार असून, ११ ते ६ पर्यन्त संचार बंदी ठेवण्यात येणार आहे. मात्र या काळात जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या वाहतूक करणार्‍यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती राव यांनी दिली.


पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या करोना रुग्णांची संख्या लक्षात घेता. नागरिकांच्या अधिकाधिक तपासण्या करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानुसार तालुकानिहाय कोविड सेंटर उभारले होते. ते आता पुन्हा कार्यान्वित केले जातील आणि आपल्या शहराचा विचार करायचा झाल्यास भविष्यात रुग्ण संख्या वाढल्यास जम्बो कोविड सेंटर सुरू केले जाईल, पण नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे, असं आवाहन आयुक्तांनी महापौरांना केलं आहे.

Most Popular

पांगरबावडी जवळ भिषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पांगरबावडी जवळ भिषण अपघातएकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यूपाच गंभीर, मृतामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेशबीड । रिपोर्टरवडवणी कडून बीडकडे येणार्‍या रिक्षाला ट्रकणे जोराची धडक...

पुजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाइल पळविला परळी शहरात घडली घटना

परळी (रिपोर्टर)- तुझ्या बहिणीबद्दल बोलायचे आहे, असे सांगून पुजा चव्हाणच्या बहिणला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका तरुणीने मोबाईल हिसकावून घेत पळ...

सराफाला लुटणारी टोळी गजाआड

चोरीचे सोने घेणार्‍या सराफाच्याही आवळल्या मुसक्यादैठण फाट्यावर भरदिवसा घडली होती घटनाबीड (रिपोर्टर)- मिरगावचा बाजार करून गेवराईकडे परतणार्‍या एका सराफाला दैठण फाट्याजवळ अडवून...

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...