आष्टी (रिपोर्टर) तालुक्यातील अनेक गावात जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढला आहे. पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कारण जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा लसीकरण करून ही मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. अनेक गावांत लम्पीने शिरकाव केला आहे. तालुक्यातील वटणवाडी परिसरात सर्वाधिक जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लक्षणं दिसून आली आहेत. तालुक्यात 262 जनावरे लम्पी बाधित झाली होती यातील 80 जनावरे मुक्त झाली असून सध्या तालुक्यात 174 गायी वर्गीय जनावरांमध्ये लम्पी चे संक्रमण आहे. 8 जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे.बाहेरील जनावरांची खरेदी थांबवण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
आष्टी तालुक्यातील जनावरांचे लसीकरण ब-यापैकी झालेले आहे. क्वचित जनावरे राहिलेले असतील परंतु आता या लम्पी रोगाचा विळखा आष्टी तालुक्यात घट्ट होताना दिसत आहे. सक्रीय 174 रुग्ण आहेत.तर 8 जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू होताच प्रशासनाने तालुक्यातील जनावरांचे आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. तसेच परजिल्ह्यातून येणार्या जनावरांवर बंदी घातली. त्यानंतर ऊसतोडीसाठी टोळ्या जाऊ लागल्याने लसीकरण झालेल्या जनावरांना परवानगी देण्यात आली, असे प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले. त्यासोबतच बाधित जनावरांपासून पाच किलोमीटरच्या परिघातील जनावरांचे लसीकरण सुरू आहे या अगोदर ही लसीकरण झालेले आहेत. त्यानंतर लसीकरण वाढवून सर्व गोवर्गीय जनावरांचे लसीकरण करून घेतले. लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. तरी त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे शेतकर्यांसमोर चिंता वाढली आहे.या गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव
तालुक्यातील इमनगांव देवळाली फत्तेवडगाव आष्टा कडा डोंगरगण जामगाव कासेवाडी सुरुडी आष्टी चिंचेवाडी टाकळसिंग कुंबेफळ मोराळा सालेवडगाव पिंपळा पिंपरी सांगवी वाहिरा शिरपूर निमगाव बोडखा केळसांगवी चिंचोली मातकुळी चिखली सिदेवाडी शिराळ राघापूर बळेवाडी सुळेवाडी शेरी खुर्द सालेवडगाव कासारी जळगाव देविगव्हाण वाळुंज वटनवाडी दौलावडगाव ब्रह्मगाव अंभोरा सराटे वडगाव ढोबळ सांगवी सोलापूर वाडी पांढरी कासारी रूटी आंधळेवाडी चिंचेवाडी सावरगाव धामणगाव महाजनवाडी हातोळण लोणी आदी सह अनेक गावांमध्ये लम्पीचा धोका वाढला आहे.लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने
शेतकर्यांनी जनावरे खरेदी करून नये
तालुक्यात लम्पी बाधित जनावरांची संख्या वाढत चाललेली आहे. पशु पालकांनी माशा,डास,गोमाशा,यांचा बंदोबस्त करावा तरच आजार अटोक्यात येईल बाहेरील जनावरे खरेदी करून आणू नयेत,जनावरांना लस टोचुन घ्यावी. लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा.
– मंगेश ढेरे
(पशुधन विकास अधिकारी,आष्टी)