• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

शासनाचा पगार घेताय व्यवस्थीत रुग्णसेवा द्या, कामात कुचराई जमणार नाही, आयुक्त तुकाराम मुंढेंच्या सूचना; मुंढेंच्या सरप्राईज व्हिझिटने जिल्हा रुग्णालयात धांदल

by Beed Reporter
October 27, 2022
Reading Time: 1 min read
0
शासनाचा पगार घेताय व्यवस्थीत रुग्णसेवा द्या, कामात कुचराई जमणार नाही, आयुक्त तुकाराम मुंढेंच्या सूचना; मुंढेंच्या सरप्राईज व्हिझिटने जिल्हा रुग्णालयात धांदल
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पेशेंट रेफर करू नका, शिस्तीत काम करा, डॉक्टर, कर्मचार्‍यांना झापले
बीड (रिपोर्टर) शिस्तप्रिय आणि धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी सुपरिचीत असलेले सनदी अधिकारी, आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे दिवाळीनिमित्त जिल्ह्यात डेरेदाखल आहेत. गावाकडील दौर्‍यावर मुंढेंनी शासकीय रुग्णालयांना भेटी देऊन आढावा घेण्यास सुरुवात केली. काल सायंकाळच्या दरम्यान अचानक त्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्याने डॉक्टर-कर्मचार्‍यांची एकच धांदल उडाली. आयुक्त मुंढेंनी स्वत: रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी कुठे औषधाचा तुटवडा, कुठे रेकॉर्ड मेन्टेन नाही तर कुठे डॉक्टरांना रुग्णालयात काय चालू आहे हेच माहित नाही. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांसह कामात कुचराई करणार्‍या, रेकॉर्ड व्यवस्थीत न ठेवणार्‍या कर्मचार्‍यांना झापझाप झापले. सरकार तुम्हाला पगार देतय, काम व्यवस्थीत करा, आता कामात कुचराई जमणार नाही, असे तुकाराम मुंढेंनी म्हटले. (पान ७ वर)
शिस्तप्रिय आणि धडाकेबाज निर्णय घेण्यात राज्यभरात सुपरिचीत असलेले आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेताच डॉक्टर, कर्मचार्‍यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच रात्री अचानक तपासणी करण्यासाठी राज्यभरात एकाच वेळी सूचना केल्या तेव्हा बीडमध्ये चर्‍हाटा, नाळवंडी येथील वरिष्ठ अधिकार्‍यांनी तपासणी केली होती. त्यावेळी डॉक्टर गैरहजर दिसून आले होते. त्यावेळी मुंढेंनी ऑनलाईन बैठक घेऊन रुग्णसेवा सुधारण्याबाबत सूचना केल्या होत्या. आता भर दिवाली तुकाराम मुंढे जिल्ह्यात डेरेदाखल आहेत. त्यांचे जन्मगाव असलेल्या ताडसोन्ना येथे दिवाळी दौर्‍यावर ते आले होते. काल तीन वाजेपर्यंत गावाकडे अनेकांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर सायंकाळच्या दरम्यान त्यांनी थेट बीड जिल्हा रुग्णालय गाठले. आयुक्त मुंढे रुग्णालयात येताच उपस्थित डॉक्टर, कर्मचार्‍यांची एकच धांदल उडाली. मुंढेंनी स्वत:हून रुग्णालयात राऊंड घेतला. तब्बल दोन ते अडीच तासांच्या राऊंडमध्ये त्यांनी बारीकसारीक गोष्टी तपासल्या. कुठे औषधाचा तुटवडा, कुठे रेकॉर्ड मेंटेन नसल्याचे दिसून आले. शासनाच्या पगारा घेताय, आता कामात कुचराई चालणार नाही. व्यवस्थीत रुग्णसेवा द्या, असे म्हणत डॉक्टर, कर्मचार्‍यांना त्यांनी झापले. वेगवेगळ्या वॉर्डात जावून त्यांनी रुग्णांची विचारपूस केली. डॉक्टरांना सिझरबाबत आणि रुग्ण रेफरबाबतही विचारणा केली. तेव्हा आलेले उत्तर हे असमाधानकारक असल्याने आपल्याकडे सर्व सुविधा असताना रुग्णांना रेफर का केलं जातं? जिथली तिथे उपचार करा, सर्व साहित्य आहे, सर्व सेवा आहेत, मग रेफर करून चालणार नाही, असेही ते या वेळी म्हणाले.

अन् मुंढेंनी बाळाचे वजन केले
रुग्णालयामध्ये पाहणी करत असताना आयुक्त तुकाराम मुंढे हे प्रसुती वार्डात गेले. त्याठिकाणी एका बाळाचे वजन केले. रेकॉर्ड मागीतले. त्यावरचं वजन आणि प्रत्यक्षात असलेल्या वजनामध्ये तफावत होती तेव्हा वजन कोणी केले? महिलेची डिलेव्हरी कोणी केली? असे प्रश्‍न विचारत कामात हलगर्जीपणा आणि कुचराई चालणार नसल्याचे सांगितले. आयुक्त मुंढे बाळाचं वजन करतील हे उपस्थित कर्मचारी, डॉक्टरांना स्वप्नातही वाटले नसेल.

Previous Post

ग्रामंपचायतींवर पाडव्या दिवशी रुमणे मोर्चे

Next Post

आष्टी तालुक्यात लम्पीचा धोका वाढला; जनावरांसाठी लॉकडाऊन करावे लागणार?; अनेक गावे लम्पी बाधित; 174 सक्रिय रुग्ण, 8 गाईंचा मृत्यू

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
आष्टी तालुक्यात लम्पीचा धोका वाढला; जनावरांसाठी लॉकडाऊन करावे लागणार?; अनेक गावे लम्पी बाधित; 174 सक्रिय रुग्ण, 8 गाईंचा मृत्यू

आष्टी तालुक्यात लम्पीचा धोका वाढला; जनावरांसाठी लॉकडाऊन करावे लागणार?; अनेक गावे लम्पी बाधित; 174 सक्रिय रुग्ण, 8 गाईंचा मृत्यू

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?