बीड (रिपोर्टर)ः- अनेक शेतकर्यांना शेतात पावसाळ्यात जाण्यासाठी कसरत करावी लागते. तर अनेक ठिकाणी रस्त्यावरुन शेतकर्यांमध्ये वाद होतात. त्यामूळे शेतकर्यांसाठी पांदण रस्ता चांगली योजना आहे. बीड जिल्ह्यात 1700 पांदण रस्त्याची मंजूरी मिळाली आहे. मात्र ही मंजूरी एैन पावसाळ्यात मिळाल्यामुळे प्रशासनाकडून ही कामे सुरू करण्यात आली नव्हती. पावसाळा संपल्यामुळे ग्रामपंचायत आणि नरेगा विभागाने मंजूर असलेल्या 1700 कामापैकी 800 कामांना सुरूवात केली आहे.
आघाडी सरकार आल्यानंतर शेतकर्यांसाठी त्यांनी पांदण रस्ता सुरू केली. ही रस्ता योजना रोहयोच्या माध्यमातून राबविली जाते. बीड जिल्ह्यात 1700 कामांना रोहयो मंत्र्यांनी मंजूरी दिली होती. मात्र ही मंजूरी एैन पावसाळ्यात आल्यामुळे ह्या कामांना ग्रामपंचायतने सुरूवात केली नव्हती. पावसाळा संपल्यामुळे जि.प. नरेगा विभागाने ग्रामपंचायतींना आदेश देवून ही कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश काढले. त्याअनुंषंगाने ग्रामपंचायतीने 1700 पैकी आज जिल्ह्यात 800 पांदन रस्त्याचे कामे सुरू केली आहे.