बीडला अप्पर अधीक्षक म्हणून सचिन पांडकर येणार, सुनिल लांजेवारांकडे आता औरंगाबाद ग्रामीणची जबाबदारी
बीड (रिपोर्टर) :-
राज्यातील पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी बदलीचे आदेश काढण्यात आले. यामध्ये बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्याकडे औरंगाबाद ग्रामिणची जबाबदारी सोपविण्यात आली आहे तर बीडला त्यांच्या जागी सचिन पांडकर येणार आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी बीड मध्ये चांगले काम केल्यामुळे त्यांची सर्वसामान्यात एक चांगली प्रतिमा तयार झाली होती.