गेवराई (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये कापसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. गेल्यावर्षी 14 हजारापर्यंत कापसाला भाव मिळाला होता. यावर्षी 10 हजार रुपयांपर्यंत भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त केली जाते. सध्या कापूस वेचणीची धुम सुरू असून काही शेतकरी अडीनडीला कापूस विक्री करत आहे. आज गेवराईमध्ये 8800 रुपयांने कापसाची खरेदी सुरू होती. तालुक्यात 22 पैकी 13 जिनींग सुरू झाल्या. आतापर्यंत या जिनींगवर 6 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.
कापूस नगदी पिक म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रात सर्वाधीक कापसाची लागवड होते. बीड जिल्ह्यात गेवराई आणि माजलगांव मध्ये कापसाचं जास्त उत्पन्न निघतं. गेवराई तालुक्यात 22 जिनींग असून त्यापैकी 13 जिनींग सुरू झाल्या. या जिनींगवर आतापर्यंत 6 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. कापसाला सध्या 8800 रुपये भाव आहे. कापसाची वेचनी सुरू आहे. ज्या शेतकर्यांना पैशाची अडचण असते. ते शेतकरी काही प्रमाणात कापसाची विक्री करतात. कापसाला दहा हजार रुपयांपर्यंत तरी भाव असावा अशी अपेक्षा व्यक्त केली जावू लागली. गेल्यावर्षी 14 हजारापर्यंत कापसाला भाव मिळाला होता. अतिरिक्त पावसामुळे बहुतांश पिक वायाला गेलं. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटेल असा अंदाज व्यक्त केला जावू लागला. जिनींग सुरू झाल्या असल्यातरी तितक्या प्रमाणात कापसाची आवक होतांना दिसून येत नाही. कापसाचा भाव चांगल्या प्रमाणात वाढल्यानंतर कापूस खरेदी विक्रीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.