तरीही काही प्रमाणात पाणी गळती सुरूच; रिपोर्टरच्या वृत्ताची घेतली दखल
दिंद्रुड(रिपोर्टर) दिंद्रुड पासून जवळच असलेल्या चाटगाव तलावाचा बंधारा काही दिवसापूर्वी अज्ञात लोकांनी फोडला होता लाखो लिटर पाणी यामुळे वाया गेले होते असे असतानाही पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले होते परंतु दैनिक रिपोर्टरने या संबंधीची बातमी प्रसिद्ध करताच धारूर चे तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी याची दखल घेत पाटबंधारे विभागाच्या अधिकार्याला झाप झाप छापल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी तात्काळ अज्ञात आरोपी विरोधात दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला व पाणी कमी झाल्याशिवाय सदरील सांडवा बंद करता येत नाही असे म्हणणार्या अधिकार्यांनी दोन दिवसात फुटलेला सांडवा दुरुस्त केला. परंतु तरी देखील काही प्रमाणात पाणी गळती सुरूच असून ती ही तात्काळ बंद करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.