बीड (रिपोर्टर) लोकनेत्या सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल मंत्री महोदय अब्दुल सत्तार यांनी बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे महिलांची प्रतिष्ठा मलिन होत आहे. अशा बेताल वक्तव्य करणार्या मंत्री महोदयांना पायबंद करावे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या अॅड.संगिता चव्हाण यांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्याबाई, भिमाई हे आमचे पुरोगामी महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांचा वसा आजही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महिला खाद्यांवर घेवून पुढे जात आहे. मात्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे कँबीनेट मंत्री आहे तरी देखील त्यांना बोलण्याचे भान नाहीत. वारंवार ते महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांच्या वक्तव्यामुळे महिलांची प्रतिमा मलिन होत आहे. लोक प्रतिनिधी सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल व शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्याबद्दल सत्तार यांनी खालच्या पातळीवर जावून वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात तेढ निर्माण होत आहे. सामान्य लोकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार व गुलाबराव पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांना समज देण्यात यावी अशी तक्रार महिला आयोगाच्या सदस्या अॅड.संगिता चव्हाण यांनी शिवाजी नगर पोलीसात दिली आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.