गेवराई (रिपोर्टर) सत्तर कोटींवर वार्षिक उलाढाल असलेल्या गेवराई शिक्षक सहकारी पतसंस्थेचे मतदान आज मंगळवार दि. 8 रोजी रोजी गेवराई शहरातील कन्या प्रशाळेत सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाले असून हे मतदान दुपारी 4 पर्यंत करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 911 शिक्षक मतदारा पैकी 47 टक्के शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून होऊ घातलेल्या तिरंगी लढ्यात कोणत्या पॅनलचे जास्त मतदार निवडणूक येणार या विषयी तर्क वितर्क काढले जात आहेत.
गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण,पुणे यांच्या आदेशाने जाहीर झाला असून आज मंगळवार दि. 8 नोव्हेंबर 2022 रोजी गेवराई शहरातील कन्या प्रशाळेत सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाले असून हे मतदान दुपारी 4 पर्यंत करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 911 शिक्षक मतदारा पैकी 47 टक्के शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून मतदान केंद्रावर 911 शिक्षक सभासद मतदार शिक्षक पतसंस्था कुणाच्या ताब्यात द्यायची, याचा फैसला करतील. नेहमी दुरंगी होणारी निवडणुक यंदा मात्र तिरंगी होणार आहे. यामध्ये परिवर्तन पॅनल, उत्कर्ष पॅनल व अपक्ष तीन उमेदवार विजयी अशी लढत होत असून परिवर्तन आणि उत्कर्ष अशी तुल्यबळ लढत होत असल्याचे दिसत असून सायंकाळी 7 पर्यंत कोणी बाजी मारली हे स्पष्ट होईल.