केज (रिपोर्टर) नको त्या क्षेत्रामध्ये लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढत असल्याने अधिकार्यासह कर्मचारी वैतागले आहेत. केज येथील तहसीलदार आणि गटविकास अधिकारी रजेवर गेले. याचं कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांना काही लोकप्रतिनिधींकडून जाणीवपुर्वक दिला जात असल्याचे सांगितले आहे. हे दोन्ही अधिकारी रजेवर गेल्याने दोन्ही कार्यालयातील अनेक कामे खोळंबून पडले आहेत.
नियमबाह्य काम करावे, असा काही लोकप्रतिनिधींचा अधिकार्यांसह कर्मचार्यांकडे हट्ट असतो. पुढार्यांच्या अशा वागण्यामुळे कित्येक अधिकारी, कर्मचारी त्रस्त होत असतात. काही जण मेडिकल रजा टाकून जात असतात, केज येथील तहसीलदार दुलाजी मेंडके आणि गटविकास अधिकारी हे रजेवर आहेत. या दोन्ही अधिकार्यांना काही पुढार्यांचा त्रास होत असल्याने हे रजेवर गेले असल्याचे सांगण्यात येते. विशेष करून तहसीलदार दुलाजी मेंडके यांचे कोरोना काळातील काम अतिशय चांगले होते. त्यांच्या कामाचे सर्वस्तरातून कौतुक सुद्धा झाले आहे. अशा चांगल्या अधिकार्याला त्रास देणे कितपत योग्य आहे? लोकप्रतिनिधी स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी पुढार्यांना त्रास देत आहे. अधिकारी रजेवर गेल्याने प्रशासनाची कामे खोळंबून पडले आहेत.