तहसीलदार सचिन खाडे यांची तीन दिवसात सलग तिसरी कारवाई
गेवराई (रिपोर्टर) पावसाचा जोर कमी होताच गोदावरी पत्रातून अवैध वाळू उपसा सुरू झाला असून रात्री तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी तहसिल कार्यालयात लावला आहे. तर तहसीलदार सचिन खाडे यांची ही गेल्या तीन दिवसतील ही तिसरी कारवाई असून त्यांच्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे दाबे दणाणले आहेत.
गोदापत्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसीलदार सचिन खाडे यांनी दंड थोपटले असून कारवाईसाठी त्यांनी महसूल प्रशासनाच्या वतीने गस्ती पथकाची नेमणूक केली आहे. दरम्यान याच पथकाच्या माध्यमातून तहसीलदार सचिन खाडे यांनी रात्री गेवराई बायपास वरून बीडकडे जाणार्या अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी तहसिल कार्यालयात आणून लावला आहे. ही कारवाई तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह तलाठी देशमुख, नेवडे, डोपे, पंकज सिरस्कर, अमोल औटी, विठ्ठल सुतार, पोलीस कॉन्स्टेबल काळे यांच्यासह आदींनी केली. तर याच पथकाच्या माध्यमातून तहसीलदार सचिन खाडे यांनी गेल्या तीन दिवसात सलग तीन अवैध वाळू वाहतूक करणार्या हायवावर कारवाई केल्याने वाळू माफियांच्या धाबे दणाणले आहेत.