नेकनूर (रिपोर्टर)ः- नेकनूरच्या ग्रा.पं.चे नगर पंचायतीमध्ये रुपांतर करावे अशी मागणी गेल्या काही महिन्यापासून होत आहे. नगर विकास विभागाने ग्रा.प.ची संपुर्ण माहिती पाठवण्याचे निर्देशीत केले. तसे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
नेकनूरची ग्रा.पं. सर्वात मोठी आहे. या ग्रा.प.चे नगर पंचायतीमध्ये रुपांतर करावो अशी मागणी येथील लोक प्रतिनिधींनी सातत्याने राज्य सरकारकडे केलेली आहे. याबाबत विधान सभेत आ. मुंदडा यांनी आवाज उठवलेला आहे. त्यानुसार राज्याच्या नगर विकास विभागाने जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवून ग्रा.प.ची माहिती मागविली आहे. तसेच पत्र सुनिल भोजनावळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले त्यानूसार जिल्हा प्रशासन ग्रा.प.ची सर्व माहिती पाठवणार आहे. नगर पंचायत व्हावी अशी सर्व नागरीकांची इच्छा आहे. अहवाल पाठवल्यानंतर निर्णय कधी होईल याकडे ग्रा.प.चे लक्ष लागून राहणार आहे.