माजलगाव, (रिपोर्टर):- स्वातंत्र्यवीर विनायक दोमोदर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या मुळे माजलगावात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने दि.18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांना गाढव समजून गाढवाला चप्पल बुटाचा हार घालून जोडे मारो आंदोलन करून काळ्या पट्या हाताला बांधून निषेध करण्यात आला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरणार्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्याचे आदेश बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, उपजिल्हाप्रमुख नितीन मुंदडा यांच्या आदेशाने माजलगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.18 नोव्हेंबर गुरूवार रोजी दुपारी 12 वाजता शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम येवले,शहरप्रमुख पापा सोंळके यांच्या नेतृत्वाखालील खा.राहुल गांधी यांना गाढव समजून गाढवाच्या गळ्यात चप्पल बुटाचा हार घालून जोडे मारून काळ्या पट्या हाताला बांधून निषेध करण्यात आला. या आंदोलनात बाळासाहेबाची शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम येवले,शहर प्रमुख पापा सोंळके, डॉ. प्रशांत पाटील, दता महाजन, सुनील खंडागळे,पवन मोगरेकर, अभय मोहरील,अभिजित कोंबडे,निलेश कांबळे, ज्योतीराम मस्कर,रामेश्वर काशिद,सुधीर कुलकर्णी, वैजनाथ चव्हाण, विनोद लड्डा, विलास नेमाने, विनोद कुलथे,अशोक आबुज,रमेश शेंडगे,सोमेश दहीवाळ,शेषनारायण कदम,रूद्रा घेणे,मोरे, दिंगाबर कुकडे आदि सहभागी झाले होते.